मी तुला नक्कीच भेटेन,
कुठे ? कशी? माहीत नाही!
कदाचित,
तुझ्या मानसीचे चित्र होऊन कॅनवासवर उतरेन.....
आणि कदाचित,
तुझ्या कॅनव्हासवरच्या चित्रातली
एक अमूर्त रेषा बनून तुला नजरेत साठवीत राहीन!
कदाचित,
सूर्याची तिरीप होऊन तुझ्या रंगात मिसळून जाईन,
नाहीतर रंगांच्या बाहुपाशात तुझ्या कॅनवासवर विसावेल...
काय सांगू, कुठे, कधी
पण तुला नक्कीच भेटेन...
नाहीतर,
अवखळ झरा होऊन तुझ्या अंगावर तुषार उडवीन,
आणि त्या तुषारानी तुझं सर्वांग भिजवून टाकीन,
एक गार शिरशिरी होऊन तुझ्या छातीला कवटाळीन..
मला बाकी काही माहीत नाही
पण एवढं कळतय की,
काळाने काहीही केलं तरी
या जन्मी तु माझ्यासमीपच असशील...
हे शरीर नष्ट झालं,
तर सगळंच नष्ट होतं ,
पण आठवणींचे कण विश्वात विरून जातात ...
मी ते कण गोळा करीन,
अन धाग्यात गुम्फीन......
ए, , मी तुला नक्की, नक्कीच भेटेन.....
अमृता प्रीतम...