येईल का तो वार्यातून, आपल्याच तोर्यातून.
मनाची माझ्या छेडूनी तार, बनवेल का तो सुंदर धून.
कसे शब्दही होतील मुके , जेंव्हा घेईल तो माझा हातात हात,
हळव्या त्या क्षणात वीर्घ्ळू आम्ही, एक न सुचलेलं गीत गात.
वेगळं असं काहीसं आयुष्य मला, त्याच्यासोबात जगायचंय,
रीकाम हे आभाळ भरलेलं, फक्त त्याच्याच डोळ्यातून बघायचय.
मग आयुष्याची फुलवू स्वप्ने, एकमेकांच्या सोबतीने ,
कुठल्याही वादळावर मात करायला, कसे उभारू एका ताकदीने.
चांदण्यांच्या सड्यावरून चालत आम्ही जाऊ,
लाटांवर स्वार होऊन, आकाशाला भेटून येऊ.
अन कधी झाले मतभेद तर,खूप खूप भांडू,
'तुझी मी अन माझा तू' हा करार हळुवार मांडू.
खरतर भेटच नाही अजुनी, तरी मला वाटते दुराव्याचे भय,
कदाचित यालाच म्हणतात प्रेम,कींवा कदाचित वेड वय.
खर्च असेल ना तो माझा?करेल ना माझी रक्षा?
ये ना रे आयुष्यात माझ्या,आता पुरे झाली शीक्षा...
Rupa...