कुठे आहेस तू?
मनाची कळी माझ्या, उमलायची तुझ्यासाठी थांब्लीये,
आयुष्यातली सुखाची घडी,वाट तुझी पाहत लाम्ब्लीये.
पण कुठे आहेस तू?
येशील ना जीवनी, तेंव्हा कसा असशील?
असेल नाकावर राग की गोड-गोड हसशील?
पण कुठे आहेस तू?
बोलशील ना तू, तेंव्हा मला अगदी क्षीतीजापलीकडे नेशील,
अन जगण्यापलीकडचाही आनंद, मला तुझ्या मीठीत देशील.
पण कुठे आहेस तू?
हसशील ना तू, तेंव्हा आनंदेल तुझ्यासोबत धरती सारी,
मी ही असेन तुझ्यासोबत, जलात वीर्घलणार्या साखरेपरी.
पण कुठे आहेस तू?
रागाव्शील ना तू, तेंव्हा भासशील तप्त वाल्वंतापरी,
मग हळुवार काढेन मी राग तुझा, बर्स्वेन तुझ्यावर प्रेमाच्या सरी.
पण कुठे आहेस तू?
भासशील कधी पावसाळा तू,भासशील कधी हिवाळा ऋतू ,
अवघं आयुष्य सहज फुल्वेन मी, हवास फक्त 'जवळ तू'.
पण कुठे आहेस तू?
सांग ना?? खूप स्वप्न बघते ना मी?
स्वप्नात काय अन सत्यात काय?फक्त तुलाच शोधते मी.
पण कुठे आहेस तू?
मन माझे आता,थकले तुला शोधूनी...
तूच काढ मला आता ,बाहेर या स्वप्नामधुनी...
Rupa...
