आजोबा
[ आजोबा म्हंटले कि उभे राहते ते त्यांचे व्यक्तीमहत्व ]
डोक्यावरती टोपी त्यातून बाहेर
पाहत असणारी त्यांची लांब शेंडी
कपालावर्ती छप्पन आट्या
त्यावरती चंदनाच्या रेघोट्या
अंगावरती सदरा , धोतर , जाकीट
जाकीतमध्ये आहे विड्याची चंची
हातात आहे वेताची छडी
आजोबा बाहेर जात
तेव्हा नातवंडांची मज्जाच होई
पण आजोबा घरात आले तर
नातवंडे दडी मारून बसे
आभ्यास तोंड पाठ घेई
पण स्वतः कधी आभ्यास केला नाही
चौथी शिकलेले आजोबा
पदवीधरान पेक्षा जास्त बोलत राही
pension आली दारी
पण आजोबा घरात नाही
आजीनी घेतली pension आणि
आजोबांना दिले tension
- सौ संजीवनी संजय भाटकर