Author Topic: भावबंध........................................  (Read 1358 times)

Offline i_omkar

 • Newbie
 • *
 • Posts: 7
भावबंध........................................
« on: January 27, 2009, 10:03:43 PM »
बासरीची ओळखीची तान,
अवचीत सापडलेले जाळीचे पिंपळपान,
वा-याचं गाणं अन माझ्या आठवणी...
विसरु शकशील मला? सांग ना?
डोळ्यांतील जोडलेला बंध,
केसातील गज-याचा गंध,
अश्रुंचे खळखळणारे पाट,
अन सोबत भिजलेली पायवाट,
तिही ओळखीचीच कदाचीत......
त्याच वाटेने पुन्हा हळुवार चालतोय,
शोधतोय त्यावर उमटलेल्या पाऊलखुणा,
त्याही तुझ्याच.........
बिथरलेय मन माझं,
सवय नाही त्याला तुझ्याशिवाय जगण्याची,
मरणाला जशी किंमत नसते,
दोन क्षण जगण्याची,
अगदी तसेच....
प्रयत्न केला अनेकदा,
पण मन मात्र मानत नाही,
स्वप्नांच शोध घेतोय,
शोधतोय त्यातली हरवलेली एक कडी,
तिच स्वप्ने माग देतील तिचा,
हरवु तर देणार नाहीच न ग तुला,
कारण......
त्यांनीच आधीच जोडलेय आपल्याला,
एका नाजुक भावबंधाने..........

नेहमीच तुमचाच


Marathi Kavita : मराठी कविता

भावबंध........................................
« on: January 27, 2009, 10:03:43 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline marathi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 212
Re: भावबंध........................................
« Reply #1 on: January 27, 2009, 10:06:56 PM »
डोळ्यांतील जोडलेला बंध,
केसातील गज-याचा गंध,
अश्रुंचे खळखळणारे पाट,
अन सोबत भिजलेली पायवाट,
तिही ओळखीचीच कदाचीत......


wow..sundar ahee....

Offline nirmala.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 392
 • Gender: Female
 • nirmala.
Re: भावबंध........................................
« Reply #2 on: December 30, 2009, 03:46:33 PM »
awsom :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: भावबंध........................................
« Reply #3 on: December 30, 2009, 08:19:37 PM »
very good :)

Offline Parmita

 • Jr. Member
 • **
 • Posts: 249
Re: भावबंध........................................
« Reply #4 on: December 31, 2009, 01:15:44 PM »
khoopach chaan...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):