पारीजातकाच्या अलगद पैजणांनी
इथं पहटेचं पाऊल जड नाही
हा त्याच्या धगधगत्या ओठाला झालेला
............ तिच्या पापण्यांचा भार होता....
रिमझीम बरसण्याचा
............ तिलाही आधिकार होता...
केसात माळून मोहचं वादळ
इथं रात्र बरसली नाही
हा त्याच्या श्वासात चिंब न्हालेल्या
........... तिच्या ओल्या केसाचा होकार होता...
मनसोक्त बरसण्याचा
............ तिलाही आधिकार होता...
मोग-यानी बकुळीच्या ओठावर
सुरांचा गुलमोहर छेडला नाही,
हा त्याच्या मिठीत अडकलेल्या
............ अस्वस्थ रातराणीचा हुंकार होता...
मुसळ्धार बरसण्याचा
............ तिलाही आधिकार होता...
धुंद रवी