त्याच्या बेभान आवेगाच्या वर्षावातुन
ओसांडणारा
परमोच्च त्रुप्ततेचा एक स्वर्गीय स्पर्श,
तिच्या दमलेल्या श्वासातुन
ओघळून
तिच्या पापण्यांवर रेंगाळताना
तिला बेचिराख करुन गेला....
तिच्या कणाकणातुन झिरपणा-या
कस्तुरीगंधानं
आधिच निष्प्रभ झालेला तो,
तिच्या डोळ्यावर चढलेला बेपर्वा कॆफ पाहून
स्तिमितच झाला....
तिच्या हरण्यामुळे... आज तो जिंकुनही हरला होता...
त्याच्या जिंकण्यामुळे... आज ती हरुनही जिंकली होती...
धुंद रवी