Author Topic: तुझ्या ओंजळीत........  (Read 11444 times)

Offline i_omkar

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तुझ्या ओंजळीत........
« on: January 28, 2009, 08:21:08 PM »

तुझ्या ओंजळीतल चांदणं
कधी पाहीलयसं का निरखुन
प्रत्येक तारा देतोय साद
त्या जडवलेल्या कोंदणीतुन निखळुन


तुझ्या डोळ्यांतील गही-या डोहांत
कधी पाहीलेयस का तु डुंबुन
कशी जादु करतात ते नकळत
ते पाहीलेस का तु कधी अनुभवुन

तुझ्या ओठांची तुलना करताच
गुलाबाच्या पाकळ्या चक्क लाजतात
बोटे मोडुन कडाकडा डोक्यावर
चटकन गालावर काळा तिळ लावतात

नेहमीच तुमचाच
ओंकार(ओम)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline GAURAV

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: तुझ्या ओंजळीत........
« Reply #1 on: January 28, 2009, 09:02:45 PM »
chan ahe