Author Topic: पहाटे पहाटे मला जाग आली  (Read 2326 times)

Offline jaysing

  • Newbie
  • *
  • Posts: 2
पहाटे पहाटे मला जाग आली
« on: December 31, 2009, 11:58:52 AM »
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला
असा राहू दे हात, माझा उशाला
मऊ मोकळे केस, हे सोड गाली

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणार्‍या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली

Marathi Kavita : मराठी कविता