Author Topic: तुला पाहते मी.......  (Read 2723 times)

Offline mkamat007

  • Jr. Member
  • **
  • Posts: 61
  • Gender: Male
  • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
तुला पाहते मी.......
« on: January 01, 2010, 09:30:52 PM »
तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तरिही मनाला, भयाचे भुलावे
कसे मी तुला, आपले रे म्हणावे
तुझी माझी तुलना, जसे नीर क्षीर
तरी वेडी आशा, नि वेडाच धीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

तुझे हासणे, चंद्र फुलतो जसा हा
तुझे चांदणे, जन्म वेडा पिसा हा
तुझे स्वप्न सत्यात, भीनले अचानक
जसे शब्द दोह्यात, विणतो कबीर

तुला पाहते मी, मना येतो धीर
तुला भेटण्या जीव, होतो अधिर

unknown

Marathi Kavita : मराठी कविता


mandar kelkar

  • Guest
Re: तुला पाहते मी.......
« Reply #1 on: July 28, 2014, 01:33:17 PM »
sir can i knw who is the author of this poem.... cause i got this from same site.. and i have composed it.. i wish u should listen this compositoin.. ill send u cd of the same song.. please mail your adress an my email id given below..

E-MAIL:- mandar.klkr@gmail.com