अजून जिंकण्याचा नाही पत्ता
पण हरण्याचा विचार करावा लागतो आता
कोड काही सुटत नाही
वाट काही सरताच नाही
पुन्हा पुन्हा पावुल चालताना
स्मरणात काही उतरत नाही
बाभळीचा काटा टोचला
पण जाणीव काही होताच नाही
आकाशात पाहताना चांदण्या दिसत नाही
म्हणून चंद्राला शोधत राहिली
वाट पाहता पाहता झोपच निघून गेली
इथे रात्र , तिथे दिवस होई
कामात वेळ निघून जाई
पुन्हा रात्र होणार,
शुकशुकाट नजरेसमोर येणार
आनंदाचा एक झोका
मनात खेळत राहणार
पाने कोरी राहतील
पण आयुष्य भरणार
तू इथे नसणार
आणि मी तुला नेहमी जवळ मनात असणार
भास तुझा असाच होणार
आयुष्य संपून जाणार
कपाळावरील कुंकवाचा रंग मिटून जाणार
न्याहाळून स्वताला मी पाहणार
पण प्रतिबिंब तुझेच दिसणार
अर्धवट हि कविता राहून जाणार
पाहण्याचा तुला मी विचार करत राहणार
जिंकून जग सारे प्रेम अपूर्ण राहणार ...
अशा या जीवनाची तू नि मी वाट पाहत राहणार...
......SARIKA