तुझी लागता चाहूल,......
उमलते फुल,
होतो चिवचिवाट पाखरांचा, झाडा मोहोरांची झुळ.
आभाळाही होते पावसाचे खूळ,
संगे विजेला घेऊन, जाते माती आनंदून
दरवळतो सुगंध असा काही मातीचा,
जणू एकसंध कुंभ फुटला अत्तराचा.
फांद्याचा घेती पाखरे आडोसा,
अनवाणी पावलांचा, चिखली उमटतो ठसा.
धरत्रीला देते कोणी अन्कुरांचा वसा,
विहार करी आनंदाने, पाण्यातला मासा.
चांदण्यांचेही मग सुटते अवसान,
भाळतो चंद्र तुझ्यावरी, विसरतो भान.
भरती सागराला येते, नदी वाहते बेभान,
कोसळतो कुणी तारा, त्याचे चुकुनी ईमान.
ध्रुव लावी ध्यान एका जागेवर बसून,
एक एक तारा येतो, खाली निसटून.
तुझ्या अंगावर पावसाचे, बाष्प दिसते उठून,
निसर्ग येतो सारा तुझ्या रुपी बहरून.
तुझ्या कांती समोर आता, लाजते बघ उन.
तुझ्या रुपातूनच घेतो श्वास, आणि जगतो आनंदून.
राहत नाही जागेवर कुडीतला प्राण.
तुझी लागता चाहूल,
उमलते फुल.
.......