Author Topic: पुन्हा एकदा..  (Read 1683 times)

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
पुन्हा एकदा..
« on: February 01, 2009, 09:33:58 PM »
ब-याच दिवसांनी पुन्हा एकदा
पुन्हा एक चेहरा खुणावतोय

डोळे मिटले की
पापण्यान्मध्ये लापतोय
डोळे उघडले की
नजरेसमोर तरळतोय..
हसरा, लाजरा, साजिरा
मूकपणे बोलणारा...
.. हरवून टाकणारा

सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ डोळे
त्यावर लपलपणा-या पापण्या
गुलाबाच्या पाकळ्याच..
बाकी काहीच नाही
मी इतकंच पाहीलं
मला इतकंच दिसलं
इतकंच पुरलं.. पुरून उरलं..!!

पुन्हा एकदा..
काळजाचा ठेका काही मात्रा थांबलाच
आणि नंतर लागली लग्गी
दिडपट की दुप्पट..
तालात आहे की नाही..
माहीत नाही
पण मी मुग्ध आहे
मी धुंद आहे.. पुन्हा एकदा.

पुन्हा एकदा साचलेल्या डोहाला
वाट मिळाली आहे..
वाहायला, खळखळायला
.. मनसोक्त नाचायला
आता मी वाहाणारच,
प्रश्न इतकाच..
असाच वाहाणार की पुन्हा एकदा..
साचणार..
आटणार..
शेवाळणार..
हिरवटणार.
बघू या..!!

एक मात्र नक्की.
माझी जागा बदलणार
अन् मागे एक खळगा राहणार..
.. इथे मी साचलो होतो....


....रसप....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रिया...

 • Jr. Member
 • **
 • Posts: 53
Re: आवडलेली कविता
« Reply #1 on: September 08, 2010, 01:41:02 PM »
छान आहे कविता... खूप heart touching आहे...