मी नसले तर....
मी नसले तर
माझ्या विचारांमध्ये कधी रमतोस का??
आपल्या नेहमी भेटायच्या ठिकाणांना
एक तरी भेट देतोस का??
आयुष्याच्या वेड्या वळणी
माझही आठवण काढतोस का??
माझ्या प्रेमात अजूनसुद्धा
रात्र-रात्र जगतोस का??
मैफिलीत असूनदेखील
कधी एकटेपणा अनुभवतोस का??
स्वप्नातसुद्धा मला बघून
स्वतःला वेड लावून घेतोस का??
एक विचारते खरं-खरं संग.....
अजूनही माझ्यावर तेवढाच प्रेम करतोस का??
अजूनही माझ्यावर तेवढाच प्रेम करतोस का??