मोडून संसार हा,
विचार कुटुंबाचा
एक वचन तोडून,
सात वचणे जपण्याचा
हा खेळ भातुकलीचा,
संसार माझा मोडला
सांडलेले कुंकू,
आज मला बोलले
हा धागा कुठला नि कसला
उत्तर काय देऊ मी तुला,
डोळ्यांत तुझ्या,
अश्रूंच्या धारा
सांगता येत नाही मला
जीव अडकला हा,
हृदयात तुझ्या
कसे तोडू हे नाते,
विचार पडला मला
नजरेसमोर ठेवून तुला,
आज शब्द मागे घेतला
पूस ते पाणी डोळ्यांतले
ए माझ्या राजा,
ए माझ्या सोन्या
दूर झाली मी जरी,
हृदयात ठेव तू मला
वेगळे दोन देह झाले,
पण मन नाही रे
जागा होऊन बघ मला,
मी समोर दिसेल तुला रे
नको जाऊस सोडून मला
ए, थांब ना!
प्रेम माझे होते कमी का?
विसरलो तुला मी म्हणून का?
तापानी फनफनताना आज
सांभाळ ना मला!
भूख लागत नाही मला ग
खर सांगतो मी तुला
आवाज तुझा कानात माझ्या
घुमत राहतो सारखा
तुझी हाक ऐकू दे मला,
फक्त एकदा आवाज दे मला
गेलीस सोडून मला, सांग कसा जगू आता?
खोट का बोललीस, वचन का दिले मला
रागविलीस तू का?
सांग ना मला !
झिडकारून हात माझा
मागे फिरलीस का?
शब्द ओठांवर आहेत तुझ्या
दिसत नाही मला का?
ठेऊ नजरेसमोर कसा तुला
पहिलेच नाही जर मी तुला !
आज तुला रोकण्यात मी अपयशी ठरलो
प्रश्न विचारता विचारता
विसरूनच गेलो
कठोर मन जिचे
ती काय मागे फिरणार
सहा सेकंद थांबू शकत नाही
सहा वर्षे कसे ओलांडणार ?
भीती मला वाटते
माझी जागा जर कुणी दुसरा घेणार.
घेणाऱ्याला घेऊ दे
पण स्वीकार त्याला तू दे
मी हरवलो तरी चालेल
पण प्रेम माझे त्याला तू दे
चाललो ठेवून हे अपूर्ण
स्वप्न होतात का ग पूर्ण?
नजरेला नजर भिडू दे
पुन्हा तो प्रवास होऊ दे
वाट तुझी पाहण्यात
हे जीवन निघून जाऊ दे.
एक सांगू ?
पण स्वताची काळजी मात्र तू घे.
हि रास जीवनाची
सरेल कधी रे
पाहशील कधी मी तुला
तू पाहशील मला रे
नभ-गर्जना होऊन
वीज पडेल अंगावर या
हि राख झाली देहाची
मग मन एक होयील का ?
वाट पाहेन त्या दिवसाची
सोबत तुझ्या जगण्याची
सांगू कसे मनातले
रागवेल सारा समाज मला रे
विचार सारणी या प्रश्नांची
संपेल कधी रे
नकोसे हे जीवन
झाले आज मला रे
विश्वास मला आहे,
तू विश्वास सोडू नको
हि साथ जीवनभर देईल
तू हात सोडू नको.
ए,
मग येशील का आता तू?
"नाही"
"नाही रे".
पुढे............
.......SARIKA BANSODE.