उल्हासित मनाने पाप्न्याना झुकवले,
मनामधिल भाव नयनान्मध्ये उतरले.
आयुष्य कसे सुन्दर असावे
केवळ तुझे नि माझे विश्व समावलेले असावे
परस्परांच्या सहवासात आयुष्य बहरून जावे
उगवनाऱ्या नव्या दिवसाने काहीतरी नवे घेउन यावे
एक न एक दिवस केवळ तुझ्याच समवेत घालवावा
केवळ तुझ्याच बहुपाशत जीवनाचा नवा रंग विरावा
तुझी नि माझी साथ अशी जन्मान्तारिची असावी
वेगले पणाची चाहुलही कधी आपल्या सहवासाला न यावी
परन्तु..............
आशा स्वप्नांची देखिल एक मर्यादा जाणवते
आणि नयनान्मधिल ती निराळी स्वप्ने
आस्वान्मध्ये विरून जाते
- निर्मला
