मी बोलतो तुझ्याशी, घेऊन तुझेच शब्द !
तू हास ना जराशी, फ़ुलतील सारे अर्थ !!
लिहीतो तुला स्मरुनि, स्मरले तुला न काही !
सुचते तरी का भासे, सुचलेच काही नाही !!
ना भेटली मला तू, चुकलेच वाटे काही !
चुकल्या अशा दिशांचा, मी खेळ रोज पाही !!
हसले का चांदणे हे, हे काय गुढ आहे ?
सांग, तुच आता काही, ही रात्र अबोल आहे !!
मी लिहितो तुला स्मरुनि, हे बोललो कुणा ना ! **
कळले तुला जे नाही, कळणार काय त्याना?
सुचलीस तुच मजला, माझे न श्रेय काही !
मी राहीलो किनारी, हा दोष तुझाही नाही !!
जे इछ्छिले मिळो तुज, ही एकच इछ्छा माझी !
कळले मला उशीरा, हरण्यात जीत माझी !!
कळणार ना तुला हे, का रात्र जागली होती !
येऊन किनार्यावरती, का नाव बुडाली होती !!
-अजय
(ajaymohite@gmail.com)