Author Topic: माझ्यात तूच तू ........  (Read 2254 times)

Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
माझ्यात तूच तू ........
« on: February 06, 2010, 07:58:08 PM »
माझ्यात तूच तू
आठवण तुझी
दाटता मनी,
भरुनी येई
नयन पापणी…….!!
हात तुझा
न माझ्या हाती,
गेली विरुनी
नाजूक नाती……..!!
तुझीच स्वप्ने नयनी
पाहती घेऊ आकार,
परि तूच नसता
सांग होती कसे साकार……….!!
असा तू सख्या
भिणलास माझ्यात,
दिसशी तूच तू
पाहता मी आरश्यात……..!!
आयुष्याच गणितच
चुकलंय तुजवाचुनी,
उरलायस तसाच
तू वजा होऊनही………!!
तुझ्या आठवणींचा
करू पाहता विसर,
आयुष्यच भासे
मज धूसर धूसर………..!!
तुझ्या सोबतीची
मनी जडे आस,
मनोमनी अजुनी
तुझेच वास……….!!
सख्या तुझेच भास…….!!

Mandar

Marathi Kavita : मराठी कविता


Offline p24pankaj

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: माझ्यात तूच तू ........
« Reply #1 on: February 07, 2010, 08:27:53 AM »
 :) Nice Peom.....

Offline SaGaR Bhujbal

 • Newbie
 • *
 • Posts: 13
 • Gender: Male
 • "प्रजा फक्त राजाला सलाम करते,तर बुद्दीवानाला सारे जग"
Re: माझ्यात तूच तू ........
« Reply #2 on: February 07, 2010, 11:48:47 AM »
khup chan aahe.... :)