मन तुझ्यात गुंतले
सुचली नाही चाल
भेटले नाही ताल
तरी ही गीत जन्मले
मन तुझ्यात गुंतले
जवळ असुन् ही तू
मनाला कधी वाटलेच नाही
हावी होती साथ तुझी पण
प्रेम हेच हे पटले नाही
शोधत फिरलो प्रेमाच्या
ते कोठेच भेटले नाही
बरोबर तू असुन् ही
मलाच ते कळले नाही
नाही दिली साद
नाही एकला प्रतिसाद
तरी ही संवाद साधले
मन तुझ्यात गुंतले
==================
गीत 11/2/09
==================