भाव आहे नयनी ह्या अन्तरीची साद दे
जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे
गुम्फल्या ह्या शब्दमाला गीत तुझे गाण्यासाठी
आगळ्या या कवितेला सप्तसूरान्चा साज दे
जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे
विरही मन हे आतुर झाले तुझ्या दर्शनासाठी
तप्त ह्रुदयास ह्या चान्दण्याची बरसात दे
जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे
आयुश्याचे मार्ग सारे चालले मी तुझ्याचसाठी
दोन शरीरे एकच आत्मा साहचर्याचे वचन दे
जुळली मने आपुली प्रेमाला प्रतिसाद दे
unknown