भाव भावनांचा कल्लोळ सुरु होतो मनात
तुझ्या आठवनिंच्या पाउल वाटेवर मग सुरु होतो प्रवास........
निराळे होते ते क्षण, सुखद होत्या त्या भेटी,
आपल्या दोघांच्या विश्वातील ती किती मृदु होती प्रीति
हर एक तो क्षण तुझ्याच सहवासाने भरलेला
अंत न येवो कधी त्या क्षणांचा याच भावनेने दाटलेला
तुझ्या नयनातले अबोल भाव ,स्पर्शुन जात होते या मनाला,
तुझी व्याकुळता, तुझी ओढ़ जाणवत होती या मनाला
त्या तुझ्या नजरेतील खेळ, अबोल भाव व्यक्त करत होते
जानून ही अजान्तेचे तू मात्र रूप पांघरलेले होते
तरीही त्यात एक गोडवा होता
मनाला जो विशेष भावला होता......
काहीही असो पण.........
तुझ्या त्या आठ्वानिंचा गोडवा मात्र काही निराळा होता
त्या पाउल वाटेवरचा तो एक हिरवळइचा भाग होता...
म्हनुनच त्या पाउल वाटेवर सारखे हे मन प्रवास करते......
आणि तुझ्या त्या भेटी त्या क्षनाना वेगलाच उजाळा देते
अशी ही तुझ्या आठ्वानिंची पाउल वाट कधीही न संपणारी
आयुष्याच्या प्रवाहा सोबत निरंतर साथ देणारी
"तुझ्या आठ्वानिंची पाउलवाट"
निर्मला......
