खळखळणारे पाणी झऱ्याचे
सुकलेला हा कंठ मनाचा
सावलीला नाही जागा
फिरतो वनोवनी शोधत थारा
डोलणारा मोर हा अंगणात
फुलवितो पिसारा
सांगू त्याला मी कसे
तुझ्या काळजाचा हा उतारा
फुलांशिवाय पानांना
जगणे कसे जमणार
मी वाट पाहेन तुझी
पण तू सोबत नसणार
राहिलो मी एकटा
आज तू का गहीवरलीस
विरळ रानांत तू गेलीस
क्षितिजाच्या तारांना का भिडलीस
गोड स्वप्नांचा मोह लागला
जीव माझा तुझ्याकडे धावला
मनात कळवळणारया
पापण्यांचा इशारा, तुला कसा ग कळला?
आज सांगतो या जगाला
मी होतो तुझाच राजा
अंधारात प्रकाश पडतो
तुझ्या प्रेमाचा काजवा
विरह झाला हा मनांचा
आठवणीच निजल्या
ओंझळीत पडला तुझ्या
थेंब माझ्या डोळ्यांचा...
थेंब माझ्या डोळ्यांचा.
........SARIKA BANSODE