कृष्णरूप राधा राधेरूप झाला कृष्ण,
ओळखता येईना राधा कोण कोण मोहन.
राधा असून ती, तिचा रंग निळा,
बासरी कृष्णाकडे आणि सूर तिच्या गळा.
रंग राधेचा गोरागोरा पान,
निळा विसरला भान, हरपली जाण.
मोरपंख नाजुकसे लाऊन फिरे माथ्यावरी,
तरी स्पर्श राधेचा मऊ रेशमाच्यापारी.
हा कसा असा खेळ अलबेला,
थक्क होई कृष्ण पाहून राधेच्या लीला.
कृष्णजन्मी येउनिया कसली हि बाधा,
वाट पाही मुरारी आणि उशिरा येई राधा.
कृष्णरूप घेउनी राधा, कृष्णालाच छळते,
राधारूप होऊन चित्त, कृष्णाचेपण जळते.
गेल्याच जन्मी चढले हे, कृष्णावर राधेचे ऋण,
मुक्या आसवांच थोडं उरलं आहे देण.
.................अमोल