तीची आठवण येते.........
आणि सतत धावणारे मन थांबत अचानक
मागे जावू लागत नकळत
आठवणींच्या पाउलवाटेवर
कोसो दूर असले तरीही क्षणभराचेच असते अंतर
तिच्या आणि माझ्यातले
आठवणींच्या पाउलवाटेवर
अजूनही स्मरते ती पहिली भेट आणि
साद घालू लागतात तिचे शब्द
आठवणींच्या पाउलवाटेवर
मग मन अधिकच रमत तिलाच शोधू पाहत
पण उरते ती फक्त जाणीव
आठवणींच्या पाउलवाटेवर
आजही ती माझ्या हृदयात आहे
तिचे शब्दन शब्द जपलेत मी
कोणास ठावूक..........
या आयुष्याच्या पाउलवाटेवर
ती पुन्हा भेटेलही कदाचित
.........................
प्रसाद 