वय तिचे कोवळे,
आणि सजण्याचे सोहळे,
मी अज्ञात त्या वाटेचा,
मज काहीच न कळे.
का आवडतात तिला फुलं,
आणि गजरा केसात माळन्या,
मज वाटे व्यर्थ सारे,
मी बघे ते क्षण टाळण्या.
तिची हर एक अदा वेडी,
आणि बोलण्याची खोडी,
ती सुरु करी बोलण्या,
मी अर्ध्यावरच विषय सोडी.
मग बसे रागावून,
फिरवून माझ्याकडे पाठ,
मी म्हणे हीच वेळ योग्य,
निघण्या इथली वाट.
पण जाताही न ये,
तिला तशी रडवेल सोडून,
मग बसे मीही तासानतास,
शपथ माझी मोडून.
तिच्या हसण्यापेक्षा तिचे,
असणेच महत्वाचे होते,
शरीरावर कुणी प्रेम केलेले,
वेडे भावच प्रेमाचे होते
........अमोल