स्वप्नात पहिले मी स्वप्नातल्या सख्याला
रविबिंब ठाकले हे स्पर्शून जाई जळाला
मन मानसात आहे जे रूप दिलवराचे
स्वप्नात रोज पाही ते सत्य नाही खासे
मन मंदिरात साजे ती मूर्त ईश्वराची
नशिबात साथ नाही अदृश्य त्या सख्याची
कातळाला सौख्य लाभे त्या स्वच्छ निर्झराचे
वाटते मलाही हे सौख्य का न माझे
प्रीती ज्यावर केली त्याचे न सौख्य लाभे
एक चूक निर्णयाची ओझे जन्मभराचे
कविता बोडस