स्वता मी काही लिहिले
आसे मी म्हणत नाही
तू सुचविते तेच उत्रवितो
बाकि काही करीत नाही
आठवणीत तुझ्या रमताना ,
तुला आठवत फिरताना
स्वताच स्वताशी केलेली
बडबड कागदावर उत्रवितो
तू सुचविते तेच लिहितो
बाकि काही करीत नाही
कधी तू हसत हसत
समोर येतेस आणि
ऐक सुन्दर रोमाँटिक
कविता तयार होते
तर कधी तु स्वप्नालु
बनुन मिठीत शिरते
आणि सहज शिळ
घालत कविता बनते
जेव्हा आश्रू तुझ्या
डोळ्यातून बरसतात
विरहाचे गीत
स्पन्दनातुन वाहतात
सर्व जर तुझेच आहे
तर मी स्वताला परका कसे म्हणु
तू सुचविते तेच उत्रवितो
बाकि काही करीत नाही
ღ ღसुगंधღ ღ