मला नाही आवडत
तुझी वाट पाहत थांबण.
उशीरा येऊनही काहीच न
घडल्याचा आव आणण.
मला नाही आवडत
तुझ्याशी वाद घालन
चुका जरी माझ्या असल्या तरी
त्या नीमुटपणे मान्य करणं.
मला नाही आवडतं
तुला शपथ घ्यायला लावण
तुझ्या वरचा वीश्वास
त्या इवल्या शब्दात मावण.
मला नाही आवडत
तुझ शांत शांत बसण.
उशीखाली चांदण ठेऊन
रात्रभर उगीच जागण
मला नाही आवडत
तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं,
हीर्यापेक्षा अनमोल मोत्यांनी
अस उगाच व्यर्थ वाहीलेल.
--- सौ. अनघा अभीजीत बोभाटे ---