द्यायचं असेल तर
एक वाचन देऊन जा
तुझ्या माझ्या प्रेमाचा
प्रत्येक क्षण ठेऊन जा
द्यायचं असेल तर
माझ्या स्वप्नांना देऊन जा.
तुज्या आठवणीत जागलेल्या
रात्रीनं परत करून जा
द्यायचं असेल तर
एक निर्मल हसू देऊन जा
माझ्या डोळ्यातल्या अश्रुना
आज तू परत करून जा
द्यायचं असेल तर
काटे माझ्या पदरात देऊन जा
तुझ्या साठी भरलेल्या फुलांची
ओंजळ तेवढी घेऊन जा.
--- सौ. अनघा अभीजीत बोभाटे ---