Author Topic: प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे  (Read 8627 times)

Offline marathi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 212
नाही बांधू शकत ताज महल मी

म्हणुन काय मी शोक करत बसायचे

प्रेमाला मनातील शब्दात बांधायचे

ठरविले मी काही तरी लिहायचे

घेतला आधार मी शायरीचा

आणि ठरविले मनसोक्त वहायचे

नाही जमल ताज महल तर

यमुनेचे पवित्र पाणी आपण व्हायचे

नाही होऊ शकत नायक मी

म्हणुन काय नालायक व्हायचे

खुप मनापासून केलेल प्रेम

पायाखाली तूडवायचे .

ठरविले मी नाही आता नाही

तटस्थ आपण रहायचे

थोडून सारी बंधने

प्रेमसागारत डुबायचे

========================
ღ ღसुगंधღ ღ 30/12/2008