तुझा रंग, तुझा गंध, निर्मळ निर्मळ,
तुझा शब्द, तुझा स्पर्श, मखमल मखमल.
शब्द तुझा ना फुटे एकही,
मौन सांगे सारे, मनात जे काही.
वेड कसे हे तुझे, सांग तूच,
शांत होते मन जे फिरते दिशा दाही.
नसता तू केवळ, वाढते जी, तळमळ तळमळ.
लाजेच्या आडून हसणे-बोलणे,
कधी वागतेस जणू अवखळ सरिता,
ढळतो आसू डोळ्यातून कधितर,
कधी सामावून घेतेस सागराची विशालता.
तुझी व्याख्या, तुझी संज्ञा, चंचळ चंचळ.
तुझा रंग, तुझा गंध, निर्मळ निर्मळ,
...........अमोल