ती आहे म्हणून मी आहे
तिचे अस्तित्व माझा श्वास चालू ठेवते ,
तिची चाहूल जगण्यास प्रवृत्त करते
ती आहे म्हणून मी आहे.....
तिचे प्रेम, जिव्हाळा आहे म्हणून मी आहे
तिचे रक्त माझ्या सळसळत आहे म्हणून मी आहे
ती आहे म्हणून मी आहे.....
तिचे असणे माझ्यासाठी जगण्याची शक्ती आहे
तिचा सोशिकपणा माझ्यासाठी आव्हान आहे
ती आहे म्हणून मी आहे.....
तिचे दुख तिचे अनुभव मी जगत आहे
ती माझे प्रतिबिंब मी तिची छाया आहे
ती आहे म्हणून मी आहे.....
आयुष्याची बरीच वर्षे गेली तिला समजण्यात
बरीच वादळे गेली तिला उमगण्यात
मला ती कळली आहे हो मला ती कळली आहे ....
ती आहे म्हणून मी आहे ...
ती हो हो ती माझी आई आहे .....
कविता बोडस