गरज म्हणून नातं कधी जोडू नकोस...
सोय म्हणून सहज कधी तोडू नकोस...
हे नातं रक्ताचे नाही म्हणून
कवडीमोल ठरऊ नकोस...
भावनांचे मोल हे जाण..
कधी व्यवहारात हरवून जाऊ नकोस..
मिळेल तितकं घेत जा..
जमेल तितकं देत जा..
दिलं - घेतलं जेव्हा सरेल,
तेव्हा हक्काने मागुन घेत जा..
अरे नात्यात तडजोड ही असतेच..
फ़क्त जरा समजुन घेत जा...!!!
नातं म्हणजे ओझं नाही,
मनापासून जरा उमजुन घे..
अरे हे तर फ़क्त विश्वासाचे चारच शब्द..
बाकि कही देऊ नकोस..
जाणीव पूर्वक नातं जप...
मध्येच जीवनाच्या अर्ध्या रस्त्यावर
माघार घेउन पाठ फिराऊ नकोस..!!!
मित्रांनो मैत्री ही दोघांची असते...
एकाने तोडली तरी दुसरयाने ती जपायची असते...
अरे मैत्री म्हणजे जणू एक पिम्पलाचे पान असते...
जरी अलगत ती कधी पडली ..
तरी जीवनाच्या सुन्दर अशा पुस्तकात ती जपून ठेवायची असते..!!