का यालाच म्हणतात प्रेम

?
वाटे पाहावेसे तुला ग सारखे किती पहिले मी तरी माझे
मन भरत नाही मला करमत नाही आता तुझ्या विना ग सखे
एवढ जरा मला तू सांगना का यालाच म्हणतात प्रेम

?
कुठे हरवलो सारे विसरलो तुला पहिल्या पासून ग
या नयनांना चारी दिशांना तुझीच प्रतिमा दिसे
एवढ जरा मला तू सांगना का यालाच म्हणतात प्रेम

?
पहिल्या पेक्षा ग वाटे नवा नवा मला आता ग का जग हा
बेधुंद व्हाव वाटे जगाव या मस्त दुनियेमध्ये
एवढ जरा मला तू सांगना का यालाच म्हणतात प्रेम

?
भूक लागेना ग झोप लागेना बदललो मी हे वाटे सगळ्यांना
अपोआप हा बदल कसा झाला ग माझ्या मध्ये
एवढ जरा मला तू सांगना का यालाच म्हणतात प्रेम

?
तुझ्याच गप्पा या तुझ्याच गोष्टी या आता असतात माझ्या मुखे
तुझा काहीही उल्लेख नाही मग बोलणे ते माझे फिखे
एवढ जरा मला तू सांगना का यालाच म्हणतात प्रेम

?
तुझ्या डोळ्यात ग मी जे पहिले आहे सत्य कि आहे स्वप्न हे
जे हाल माझ्या तसे हाल तुझ्या आहे मनाचे का सेम
एवढ जरा मला तू सांगना काय करतेस तू माझ्यावर प्रेम