प्रेम
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसत याच गाव एक.....
ह्रुदयातून वाहतो याचा भाव एक
लहानापासून मोठ्यापर्यंत याची धाव एक.....
प्रियसीपासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक
हे खर मिळाव जगात याची आशा एक.....
सर्वांच्या ह्रुदयात दिसते ही दिशा एक
खोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक.....
प्रेमाच्या असतात भावना अनेक
विशवात वाहते याची कामना एक.....
डोळ्यातून ह्रुदयात उतरतो हा जीना एक
काळ कुठला ही असो याचा ज़माना एक.....
देवानी दिलेले हे वरदान एक
खरया मनात याच दान एक.....
तुटलेल्या ह्रुदयात याच रान एक
सर्व लोकात याचा मान एक.....
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....
कमलेश गुंजाळ