गोड स्वप्न *
नकळतच सारे हे घडले
तुझे माझे बंध कसे हे जुळले
दिसलास जेव्हा सामोरी
स्वतःला सावरू नाही शकले
धावतच येऊन तुझ्या गोड मिठीत दडले
मग हळूच ओठ तुझ्या गालावर येऊन टेकले
चालता चालता आयुष्याचे बरेच विषय निघाले
सगळ्यांना दूर सारून फक्त एकमेकांत रंगले
थांबायचे की जायचे असे बहाणे ही झाले
मग हळूच जवळ येऊन दुनियेस भुलले
तुझ्या स्पर्शाने मन मोहरुन गेले
माझेच मला कसलेही भान ना उरले
ओठांवर ओठ जेव्हा ते टेकले
पूर्ण सर्वांग फक्त शहर्याने भरले
पाकळ्या जणू ओठांच्या एकमेकांत गुंतत गेले
डोळ्यांनी वा शब्दांनी जे कधी नाही कळले
ते स्पर्शातून आज तुझ्या सारे काही उमजले
म्हणून ते क्षण पुन्हा हवे हवेसे वाटले
होताच जाणीव वेळेची
डोळे हे गोड स्वप्नातून जणू जागे झाले.....
कवी - Mrs. KK