Author Topic: ओलावा  (Read 1180 times)

Offline Mrs.KK

  • Newbie
  • *
  • Posts: 7
ओलावा
« on: October 30, 2021, 03:48:29 AM »
            *ओलावा *
हरवले मी कुठेतरी शोध ना तू मला
धुंडाळून बघ स्वतःतच सापडते का तुला
चाफा तू माझा कुठे हरवलस का मला
बघ ना एकदा तुझ्याच श्वासात सापडते का तुला
डोळे बंद जेव्हा करशील पाहशील का फक्त मला
माझे स्मित आठवून अलगद हसू येईल ना तुला
स्पर्शाचा तो ओलावा अजुनी जाणंवतो मला
त्याच ओलाव्याचा भास कधी होतो का रे तुला
आठवण तुझी उरी दाटून येते मला
थोडीशी आठवण माझी येते ना तुला
श्वासात श्वास तुझा माझा गुंतलेला
आजही आणतो तसेच शहारे मला
हृदयाच्या ठोक्यांची गती माझ्या ऐकू येते ना तुला
शरमेने लाल झालेले चेहरे हवे हवेसे वाटतात मला
शरम सारी दूर करून एकमेकांत गुंतायला पुन्हा आवडेल ना तुला.....

कवी - Mrs. KK

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
अकरा वजा दोन किती ?  (answer in English number):