येशील का ?
तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी येशील का ?
साथ तुझी हाथ तुझा कातरवेळी देशील का ?
भिरभिर होत मन पाखरू, संग मनाला कसे आवरू ?
ओठांवर थरथर, मनात या हुरहूर,
उमलून येता कळ्या, फूल माझे होशील का ?
या मनाची या हृदयाची तूच ओढ तूच आशा,
कधी न कळली तुला या डोळ्यांची ही भाषा
मावळतीचा चंद्र वेडा सांग आता देशील का ?
साथ तुझी, हाथ तुझा कातरवेळी देशील का ?
तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी येशील का ?
येशील का ?
येशील का ?
(कवी अनामिक.)