ती पावसाची सर
कशी आली अंगावर
लट निथळते कशी
थेंब थेंब गालावर
चिंब भिजूनीया आली
अशी नजरे समोर
जणू दिवसा पहावी
रातराणीची बहर
आता हटायची नाही
तुझ्यावरची नजर
गाली हसुनिया सखे
केला भलता कहर
रूप देखणे तुझे हे
मन झाले अनावर
तुझ्या प्रेमानेच आता
सखे मला तू सावर
********
शशिकांत शांडीले, नागपूर
मो.९९७५९९५४५०