माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
माझ्या या आयुष्यात एकदा येवून बघ
माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
ना दिवस ना रात्र , छाया तुझीच सर्वत्र
प्रेमाच्या या कालचक्रात फिरून एकदा बघ ....अन
माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
तुझ्यावाचून राहवेना जीव माझा लागेल ,
ऊगाच अशी दूर तू , समोर एकदा येवून बघ .....अन
माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
माझ्यासारख्या जीवाचा अंत असा पाहू नको ,
जीवनाच्या या वाटेवर साथ एकदा देवून बघ ....अन
माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
तुझ्याच शब्दांना भावूक हे आज माझं मन आहे ,
याच शब्दरूपी मनात एकदा तरी डोकावून बघ ....अन
माझ्या या शब्दरूपी जीवनाला वाक्य एक देवून बघ ......
शांत लयेच्या सुंदर राती , बिथरलेल्या या ओठांनाआवर एकदा घालून बघ ....
आणि विरोध करणाऱ्या मनाला समजावून मिठीत एकदा येवून बघ .......

अतुल देखणे