तूच का ती .......
तूच का ती ...
जी माझ्या हृदयामध्ये घर करून बसलीये
माझ्या गीतांमध्ये सूर बनुन राहीलीये
माझ्या वाक्यामध्ये शब्दरुपी झालीयेस
तूच का ती ...
माझ्या भावनांना आवरणारी ...
माझ्या मनाला सावरणारी ...
या जीवलग कायाला उबदार माया देणारी
तूच का ती ....
न सांगता माझ्या मनातील भाव ओळखणारी ,
तल्लीन होवून माझ्या कवितांमध्ये , नकळत गाल फुगवणारी,
तर कधी सर्वांची नजर चुकवून गोड गालात गुप्त हसणारी ...
तूच का ती ....
उमलत्या गुलाबाच्या पाकळी प्रमाणे ,
अलगद माझ्या जीवनात येवू पाहणारी ..
आणी त्यासाठी माझ्या वाटेवर डोळे लावून आतुर होणारी ....
तूच आहेस ती ....
"येशील कधी समोर माझ्या , या वीचलीत हृदयाला सावराया,
आणी आपल्या दोन मनांचं रुपांतर या एकच देहात कराया"
अतुल देखणे