माझ्या प्रिय मित्र मैत्रिणिनो, खालील ओळी मी ६ जून तारीख मनात धरून लिहिल्या आहे तरी, ज्यांची तारीख वेगळी असेल त्यांनी ती टाकून हे आमंत्रण वापरावे...
प्रिय शरू.....
सहा जून या गोड दिवशी
तू असावीस माझ्या पाशी,
नवीन नात्याचं पाहिलं पाऊल
सुंदर आयुष्याची लागेल चाहूल.
मांडव घातला आहे दारी
आनंद पसरेल आपुल्या घरी,
येणार आहे फक्त तुझ्याच साठी
घेऊन हाती सोन्याची अंगठी.
सुख दुख सर्व वाटून घेऊ
नाजूक आठवणी आपल्या गाठीशी ठेऊ,
प्रेमच निमंत्रण देतो आहे तुला
नक्की यायचं आपल्या साखरपुड्याला.
लाडके नक्की यायचं हं...
....कवी मन अतुल