कशी जुळतात नाती,
प्रीती जुळते कशी ?
गुंफते मनात मन का ?
मीपण होते अनोळखी.
बावरतात क्षण हरेक का ?
ऋतू हिरवे बहरती.
जाणवे स्पर्श मोरपंखी,
सूर बासरीचे गाती किती !.
इंद्रधनुचे रंग सात,
क्षणोक्षणी मनी पसरती.
लाज गाली, गुज कानी,
भिडते नजरही ओझरती.
बोल हळवे देती साद,
प्रतिसाद देते भावना.
मिठी खुली हि तुझ्याचसाठी,
बंध सोडून धावना.
सुटतात मग गणिते सारी,
मिळती सारी उत्तरे,
क्षणात होता भेट प्रियाची,
मिटती सारी अंतरे.
........अमोल