अक्षर
*********************************
*********************************
आज खुप दिवसांनी समुद्र भेटला
मला एकटाच पाहुन हसला
'तुझी ती नाही आज बरोबर' म्हणुन खळाळला
मी हातातली कवितांची वही दाखवत म्हटलं
आजकाल ती इथे असते..कायमचीच !
तो पुन्हा उसासला,
'सगळ्यांच बघ असच होतं,
शेवटी सर्व वहीतच रितं होतं'
मी हसलो..म्हणालो
असेल....पण सगळ्यांच 'अक्षर' सारख नसतं!!!!
.................गिरीश कुलकर्णी