Author Topic: रात्र ओलावलेली.....  (Read 1185 times)

Offline pankh09

  • Newbie
  • *
  • Posts: 41
रात्र ओलावलेली.....
« on: July 23, 2010, 06:49:28 AM »
ओलाचिम्ब होतो मी, नखशिखांत तू भिजलेली
आठवते का तुला ती, रात्र ओलावलेली.....

होता वाऱ्याचा थरार, उठला अंगभर शहारा
ओल्या मनात माझ्या, तुझ्या प्रेमाचा निखारा

ओघळते रूप तुझे...तव प्रतिबिम्ब माझ्या मनात
थरथरते शब्द माझे..विरघळून जाती या पावसात

तुझ्या थरारत्या ओठांनी... आता लावले मला वेड
तुझ्या एका स्पर्शासाठी जणू ...या थेम्बांची चढ़ाओढ़

माझ्या कापऱ्या हातांनी, घेता हात तुझा हाती..
येता अलगद जवळ तू...धडधडते माझी छाती

सोडवून हात अपुला...गेलीस लाजुन दूर तू....
भिजवून मला तुझ्या रंगी....जणू प्रत्येक थेम्बात तू.....

झाला उशीर म्हणुनी ....गेलीस तशीच तू निघून...
गेले पावसासंगेच सर्व....शब्द ही माझे बरसून...

त्या रात्री पासून आजवर...हा चातक वाट पाही..
नाही आलीस कधीच तू अन....ती रात्र ही आली नाही ..

तुझ्याविना हे शब्द माझे अन हा पाउस देखील पोरका
चिम्ब मी आहे भिजलेला पण....आतून अगदी कोरडा....आतून अगदी कोरडा...


--पंकज सोनवणे....(स्वरचित)

Marathi Kavita : मराठी कविता