ऑफिस सुटल्यावर त्याचे मेसेज येणं नेहमीच
पोहचलीस का घरी? प्रश्न विचारतो तो उगीचच
काळजी होती तिची त्याच्या मनाला
अपवाद होता ती त्याला आता पर्यंत भेटलेल्या साऱ्या जणांना
चेहरा तिचा पडलेला दिसताच त्याचाही चेहरा उतरतो
ती आजारी पडते आणि टेंशन मात्र हा घेतो
तीने काही खाल्ल नाही तर त्याचे मन त्याला खाते
कोमजलेला तिचा चेहरा पाहता डोळ्यांत पाणी त्याच्या भरते
तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मन त्याचे झटते
तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसता त्याच्या आनंदाला आकाश ठेंगणे होते
तिने यल्लो नाहीतर लाल ड्रेस घालतच विकेट त्याची पडते
मग तिला ऑफिस मधी चोरून चोरून बघताना डोळ्यांची धांदल उडते