जेव्हा तुझ्या ओठांचा चहाच्या कपाला स्पर्श होतो
आणि त्यातील चहा मी तुझ्या नकळत हळुच पितो
क्षण तो माझ्यासाठी सुखाचा असतो
चहातील साखरेची ती चव असते
की तुझ्या ओठांनी चव त्यात उतरते
त्या चहाच्या गोडव्याला कोणतीच तोड नसते
तु आणि चहा रोज हवी हवीशी वाटते
तुझ्या बरोबर चहा असला की वेळेचे भान कोणाला राहते
तुझ्यासवे सकाळची संध्याकाळ कधी झाली याचे मनाला कोडे पडते
रात्र सारी वाट पाहण्यात निघुन जाते
तुझ्या भेटीची ओढ लागते
सकाळी मात्र चाह घेतना तुझी हजेरी लागते
तुझ्या ओठांवरील हास्यात मन माझे मन गुंतते
ओठांचा स्पर्श कपाला होता चहाला ओठांची चव येते
चाखण्या चहाची गोडी मग माझी धडपड सुरू होते