तू अशी ये चोरपावलांनी की मला फक्त तुझाच भास व्हावा
अन मग तू येवून सामोरी हात हाती घ्यावा
तुला पाहताच मी तुला अगदी जवळ घ्यावे
इतके की पौर्णिमेचा चंद्र देखील लाजावा
तुझ्या मोकळ्या केसांना छेडताना
वाऱ्यालाही येईल माझा राग
आणि मग रागाने लाल होवून तोही सुसाट व्हावा
गदागाडावे आसमंत नि काजव्यांनी गावे आपले प्रेमगीत
आपल्या मिलनाची ती रात पाहुनी राधे कृष्णालाही वाटेल हेवा
तुझ्या स्वप्नांत नखशिखांत बुडून गेलो आहे ग
सांगणं केव्हा मिटेल हा दुरावा .........?
-मित