का कळेना सर्वीकडे तु दिसू लागली
ईथे तिथे तुच भासू लागली
का कळेना मनाला तुझी ओढ का लागली
तुझ्या भेटीची उत्कंठा मानला का होऊ लागली
का कळेना डोक्यात तुझ्या विचारांची गर्दी होऊ लागली
विचारांच्या नादात ओठांवर हास्याची लकेर उमटू लागली
का कळेना डोळ्यांना तुला बघण्याची शर्यत लागली
संपूर्ण ऑफिस मधी तुला शोधायला नजर माझी धावू लागली