बरसून जाऊ दे तुझ्या डोळ्यांतला पाउस
हूर हूर मनाला लावून अशी नको जाउस
ओसरून जातील हे ही ढग दु:खाचे
पण चांदणे, अशी तू उदास नको राहूस,
बघ खिडकीशी उभा हा खट्याळ वारा
सागर ही बघ सोडून त्याचा किनारा
तुला हसवण्या आला आसमंत सारा,
चल स्वागत कर त्यांचे, डोळे पूस,
चांदणे, अशी तू उदास नको राहूस,
हिरमुसलेला तुझा हा अबोल चेहरा
कुठे गेला तुझा तो रंग हासरा?
खळाळू दे तुझ्या हास्याचा अवखळ झरा
आता आसवांचा पूर नको वाहूस,
चांदणे, अशी तू उदास नको राहूस,
--जय